बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना Health Scheme for Construction Workers

जनकल्याणाच्या योजना 

नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत योजनांचा लाभ घेण्याकरिता वय वर्षे १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे . इमारत व इतर बांधकामाच्या व्याख्येत २१ कामांचा समावेश करण्यात आलेला आहे .

Health Scheme for Construction Workers

हे देखील वाचा »  श्रम योगी मानधन योजना I श्रमिकांना मिळणार 3000 रु महिना


ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

 1) छायाचित्र 

2)ओळख पुराव्यासाठी आधारकार्ड , पारपत्र , वाहनचालक परवाना , पॅनकार्ड , मतदान ओळखपत्र यापैकी एक 

3) रहिवासी पुराव्यासाठी आधारकार्ड , पारपत्र , वाहनचालक परवाना , शिधापत्रिका , मागील महिन्याचे वीज देयक , ग्रामपंचायत दाखला यापैकी एक 

4) वयाबाबतचा पुरावा आधारकार्ड , पारपत्र , वाहनचालक परवाना , पॅनकार्ड , जन्माचा दाखला , शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक . ( पूर्ण जन्मतारीख नमुद असणे आवश्यक ) 

Health Scheme for Construction Workers

5)स्वयंघोषणापत्र 

6) आधार संमतीपत्र 

7) मागील वर्षात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याबाबत नियोक्त्याचे , ग्रामसेवक , महानगरपालिका , नगरपालिकाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र 

8) बँक पासबुकची छायांकित प्रत 

हे देखील वाचा »  जुनी विहीर दुरूस्ती,नवीन विहीर बांधणी I सरकारकडून अनुदान मिळणे सुरू,आताच अर्ज करा

Health Scheme for Construction Workers

आरोग्य योजना

1) नोंदित लाभार्थी स्त्री व पुरुष बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५ हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २० हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य . 

2) लाभार्थी कामगार व त्याच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ १ लाख रुपये एवढे वैद्यकीय सहाय्य . नोंदित लाभार्थी कामगार अथवा त्याच्या पती किंवा पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १ लाख रुपये मुदत बंद ठेव 


3) नोंदित लाभार्थी कामगारास ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास २ लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य . तथापि , नोंदीत बांधकाम कामागाराचे विमा संरक्षण असल्यास , विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत २ लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ अनुज्ञेय . 

4) व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचाराकरीता ६००० रुपये अर्थसहाय्य . 

हे देखील वाचा »  शेती तसेच जमिनीचे कर भरा घरबसल्या I टे ही मोबाइलवरून
Health Scheme for Construction Workers

अधिक माहितीसाठी संपर्क

बांधकाम कामगारांनी अधिक माहितीसाठी नोंदणी नुतनीकरण , लाभाचा अर्ज करण्याकरिता https://mahabocw.in या संकेतस्थळाचा वापर करावा . 

तसेच अपर कामगार आयुक्त , बंगला क्रमांक ५ , मुंबई - पुणे रोड , शिवाजीनगर पुणे- ५ , दू . क्र . - ०२०-२५५४२६११ येथे संपर्क साधावा . 

जिल्हा माहिती कार्यालय , पुणे


Previous Post Next Post